खरंच असं झालं तर.....
खरंच असं झालं तर.....
आज अखिलविश्र्व कोरोनामुळे त्रस्त झालं आहे. कोट्यावधी लोक कोरोना संक्रमित झालेत, लाखो रुग्ण दगावले. तरीही जगातल्या एकाही देशाला या आजारावर लस शोधण्यात अद्यापपर्यंत यश मिळवता आलं नाही. आपला उत्सवांचा राजा - गणेशोत्सव, अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे . काहीतरी मार्ग निघावा, ही भयंकर महामारी नष्ट व्हावी, अशी प्रार्थना आज प्रत्येक जीव करतो आहे. आपली ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण झाली तर....
आणि खरंच असं झालं तर....
गणपतीला घाबरून कोरोना पळाला तर....
कॉलर ट्यून बदलून, "गजानना श्री गणराया" झाली तर....
सगळेजण बिनधास्त पुन्हा, एकत्र जमू लागले तर....
विनोद करताना एकमेकांना, टाळी देऊ लागले तर....
खरंच असं झालं तर.....
मास्कच्या ऐवजी, "मोरया" टोपी मिळाली तर....
औषधांच्या वासाऐवजी, सुगंधी धुप दरवळला तर....
जंतुनाशकाऐवजी गुलाल उधळला तर....
खरंच असं झालं तर.....
सायरनऐवजी, ढोलताशे गडाडले तर....
थाळ्यांऐवजी, फटाके वाजले तर....
एकटे पडलेले रस्ते, पुन्हा गजबजले तर....
रोषणाईच्या सामानाने, बाजार पुन्हा चमकले तर....
खरंच असं झालं तर.....
आर्सेनिकच्या गोळ्यांऐवजी, लाडू खायला मिळाले तर....
लाडू आणि करंज्यांनी, डबे पुन्हा भरले तर....
उसळ आणि पोहे खाऊन, भजन पुन्हा गायले तर....
खरंच असं झालं तर.....
आमच्यासोबत भिंतींनाही, नवा पोषाख मिळाला तर....
छताला पताक्यांची, पुन्हा साथ मिळाली तर....
पाहुण्यांना आमच्या घरी, भेट देता आली तर....
खरंच असं झालं तर.....
खरंच असं झालं तर.....
- सचिन काळोजी.


.jpeg)
👌👌
ReplyDeleteThanks!
Deleteखरच अस. झालं तर आम्हाला बाप्पाचे दर्शन तरी होईल...
ReplyDeleteका नाही? नक्कीच होईल.....
Deleteखुप छान.. खरंच असे होऊ दे रे बाप्पा लवकर 🙏🙏🙏
ReplyDeleteThanks! नक्की होऊदे !
ReplyDelete👌
ReplyDelete