Rain And Me...| पाऊस आणि मी...

     बालपण म्हटलं की सगळ्यात आधी आठवते ती बालमित्रांसोबत केलेली मस्ती. शाळेत मधल्या सुट्टीत घातलेला धांगडधिंगा. या साऱ्या आठवणींमधे सरस ठरतात त्या पावसातल्या मनमोहक आठवणी.....


लहानपणी शाळा सुटतानाच नेमका पाऊस यायचा,
जणु काही त्याचा आमचा आधीच प्लॅन असायचा.


एकमेकांवर पाणी उडवताना मज्जा खूप वाटायची,
कपडे भिजले कि आईच्या ओरड्याची भीति मनि दाटायची.

भिजून घरी पोहचेपर्यंत थंडी काय वाजायची,
म्हणून तर आई गरमागरम कांदाभजी द्यायची.


आता मोठे झालो, शहाणे झालो, जबाबदारी वाढली,
पावसातली मजा सारी, बालपणातच हरवली.

छत्री आणि रेनकोटाचा आता होतो एकच खेळ,
पाऊस आणि प्रवासाचा नाहीच बसत ताळमेळ.

भिजलो तर आता वाटे आजाराची भीती,
डॉक्टर आणि औषधांचा खर्च मग तो किती.

गच्चीत बसून आता जेव्हा पावसाला पाहतो,
बालपणीचा आनंद मला सहज खुणावून जातो.

- सचिन काळोजी.

Comments

Post a Comment