Without You...| तुझ्याविना...

तुझ्याविना.....

    सगळंकाही मजेत चाललेलं असतं, कशाचीही कमी नसते. तरीसुद्धा अधूनमधून त्या आठवणी मनात डोकावतातच. ते दुःख, ती खंत जी उरात दबलेली असते, तिला भरती येतेच. त्या पुराचं पाणी आसवे बनून डोळ्यांतून वाहू लागतच....



'ते' नक्की काय असतं, अजूनही नाही कळलं,
मन मात्र वेडं सदा, तुझ्याकडेच वळलं.

दमुन थकुन काढतो जेव्हा, स्वतःसाठी निवांत वेळ,
सुरू होतो पुन्हा तेव्हा, जुन्या आठवणींचा नवा खेळ.

नसलीस तू सोबत जरी, भावना ही आहे खरी,
प्रवासात या माझ्या मना, दिधली तू नवी उभारी.

दाटूनि येतो कंठ, जगताना तुझ्याविना,
सावरतो मग कसंबसं, भाऊक झाल्या माझ्या मना,

भाऊक झाल्या माझ्या मना.

- सचिन काळोजी


Comments