She...| ती...

     त्या अल्लड वयात "ती" कुठेतरी दिसते, आवडायला लागते, स्वप्नांचे मनोरे उभारते. आज ते मनोरे नाहीत, पण आठवणींचे काळे मेघ अधूनमधून दाटून येतात आणि बरसायला लागले की आजही चिंब भिजवून टाकतात....


ती नेहमी पहायची वळून, गालातल्या गालात हसून,
कळत नव्हतं मला, बघतेय हसून कि हसतेय बघुन.



असेच दिवस जात होते, स्वप्न मोठे होत होते,
मी नुसताच उभा, समोरून ती जात असे.

कधि दिसे रस्त्यात तर कधी गच्चीत,
मी तर मस्त रमलेलो माझ्याच धुंदीत.

वाटे कधि भेटावि ती एकटिच गल्लित,
पटकन तिला सांगावे मनिचे सर्व गुपित.

मनात होतं बरच काही, घाई होति शब्दांनाही
पण धीर झाला नाही, तिलाही काही कळले नाही.

वर्षे आता गेली उलटून,
मी ही तिला थकलोय शोधून.

कुठे असेल आता कुणास ठाऊक,
मी तर होतोय उगाच भाऊक.

आठवत असेल का तिलाही अजून,
की गेली असेल सगळंकाही विसरून.

असो. आता मी पण गेलोय जगण्यात रमून,
राहिलीय "ती" फक्त, फक्त आठवण बनुन....

- सचिन काळोजी.

Comments