Lokamanya | लोकमान्य


     बाळ गंगाधर टिळक, यांचा इतिहास आपण शाळेत असताना वाचलाच आहे. दरवर्षी जयंती आणि पुण्यतिथी साजरी देखील करतो. पण टिळक विचारसरणीचा आदर्श घ्यावा, त्यांची विचारसरणी अवलंबवावी, असं कधी कुणाला वाटलं का?

आज लोकमान्य टिळक या महान नेत्याची पुण्यतिथी.
लोकमान्य

     "लोकमान्य" ही पदवीच त्यांच्या लोकप्रियतेची ग्वाही देते.
त्यांचे पूर्ण नाव, जन्मठिकाण, आईचे नाव, वडिलांचे नाव, वगैरे सगळंसगळं तुम्हाला माहीत आहेच. 
'अध्यक्ष महाशय आणि पुज्य गुरुजन वर्ग......' इथून ते अगदी ' जय हिंद, जय भारत !' पर्यंत सगळं तोंडपाठ असेलच. 

मवाळवादी नेते कुठे कमी पडत नव्हते, पण त्यांच्या कार्याला गती देण्यासाठी जहाल विचारांची गरज ही होतीच. टिळकांनी ती जाणली आणि ती उणीव भरून काढली.

"स्वराज्य हा माझा जनमसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच !" , टिळकांची ही सिंहगर्जना आज सगळ्यांनाच माहित आहे. पण टिळकांच्या या सिंहगर्जनेतील "स्वराज्य", सुराज्य बनवण्यासाठी आपण काही करतोय का? टिळकांना अभिप्रेत असलेले स्वराज्य आपण अनुभवतो आहोत का? आम्हाला स्वराज्य आणि सुराज्य या शब्दांची व्याख्या तरी कळली आहे का?

त्यांनी सार्वजनिक उत्सव सुरू केले. का? असं करण्यामागचा त्यांचा उद्देश तरी काय होता? तो का नाही आपण लक्षात घेत? सर्वांनी एकत्र यावे, हे जाणलं आम्ही, पण फक्त उत्सव साजरे करण्यापुरतेच एकत्र रहावे का?



आज टिळकांच्या पुण्यतिथी दिवशी, त्यांच्या शिकवणीवर आणि कर्तृत्वावर नक्कीच संशोधन करा. खूप मोठा आदर्शमय इतिहास घडवला आहे या नेत्याने.
त्याचे अध्ययन नक्कीच करूया !

- सचिन काळोजी. 

Comments

Post a Comment