The Journey of Love... | सफर प्रेमाची...
सफर प्रेमाची.....
माहित नाही कशी, पण मैत्री त्यांची जुळली
सहवासात एकमेकांच्या, मने दोन्ही रमली
हास्य उमलले चेहऱ्यावरती, चिंता काहीशी दुरावली
जगण्यातल्या आनंदाची, सहज पदोन्नती झाली
एकमेकांची वाट पाहताना, मने अधीर झाली
अधिरल्या मनांचीही, मग बेचैनी वाढली
जिव्हेवरती तेव्हा, शब्दांनी गर्दी केली
दबुन बसल्या भावनांना, जेव्हा उभारी आली
तुझं माझं सगळंच आता, आपलंसं झालेलं
समजून घेणं आणि समजावणं, सारखच भासू लागलं
झोपेलाही झाली आता, सवय जागरणाची
कधीच पळून गेली होती, भीती काळोखाची
व्हॉट्स ऍप आणि मेसेंजेर, दोन्ही आहेत साक्ष
इथेच त्यांनी गुंतवला, आपला सर्व लक्ष
मैत्री आणि प्रेमातली, सीमारेषा पुसली
नव्या दुनियेची आता, स्वप्ने फुलायला लागली
अखेर मनातल्या भावनांनी, शब्दरूप घेतलं
दोघांनीही एकमेकांचं, प्रेमपुष्प स्वीकारलं
फिरू लागले घेऊनी, मग हातात हात
मंजुळ गाणे प्रेमाचे, आनंदाने गात
याच्या घरचे, तिच्या घरचे, सर्वांची पसंती झाली
एकेकाळची मैत्री आता, जीवनसोबत बनली
सत्यात साकारली, स्वप्ने कल्पनेतली
आनंदाने चिंब भिजली, सफर प्रेमाची.....
- सचिन काळोजी.


.jpeg)
अप्रतिम ❤️🔥
ReplyDelete