Independence | स्वातंत्र्य


सोनेरी दिवस तो अखेर उजाडला
स्वातंत्र्याचा सुगंध तनामनांत दरवळला

सांडिले ते रक्त आपुले क्रांतिवीरांनी
गोंदविले पाठीवरती वळ त्या शूरांनी
सोडिले होते तेव्हा संसारावर पाणी
म्हणुनी आज फडकतो तिरंगा गगनी

भोगिल्या नरकयातना आणि कारावास
फासावरती चढताना कोंडला श्वास
हसत हसत सहन केला हा सगळा त्रास
मनामधे पक्का होता स्वातंत्र्याचा ध्यास

मुक्त केले देशाला परकीय गुलामीतून
स्वदेशीच्या जीवावर, परावलंबनातून
दिवस आज उगवतो स्वाभिमानातून
शूरवीरांनी केलेल्या त्या बलिदानातून

तुम्हीच राखला तिरंग्याचा खराखुरा मान
तुम्हा शूर वीरांना करीतो सादर प्रणाम !
|| जय हिंद ||

- सचिन काळोजी.

Comments

Post a Comment