Mumbai Meri Jan Aur Mera Bharat Mahan | मुंबई मेरी जान और मेरा भारत महान
Mumbai Meri Jaan Aur Mera Bharat Mahan!
मुंबई मेरी जान और मेरा भारत महान !
मुंबई मेरी जान और मेरा भारत महान !
तिला सांगायचं होतं सगळंच
पण ती बोलली काही वेगळंच
तिला सुनवायचं होतं एकाला
पण ऐकू गेलं दुसऱ्याला
राग धरला तिसऱ्याने
आणि हात धुतले चौथ्याने
तिचं घर, यांची कारवाई
सगळीकडे नुसती घाई
त्याचा जीव, घेतलाय कोणी ?
त्याने स्वतः की अजुन कोणी ?
नाही कळलं कारण असली
पदार्थही निघाले अमली
उत्तराच्या शोधार्थ निघाले
प्रश्नालाही विसरून गेले
कुणालाच कुणाची नाही पडली
ज्याने-त्याने आपापलीच भाजली पोळी
लॉकडाऊन मधली ही घटना
अनलॉक मधेही गुंता सुटेना
इस्पितळात आहे खाटांची उणीव
आहे का कुणाला याची जाणीव ?
मी कोण? तू कोण? कुणाचा काही पत्ताच नाही
माझं कोणतं? तुझं किती? यावरच चर्चा सारी
मुंबई कुणाच्या बापाची असेलच कशी ?
कारण ती तर सर्व बापांचीही आई
अशी कशी सगळ्यांनीच बुद्धी ठेवली गहाण ?
काही का असेना,
मुंबई मेरी जान और मेरा भारत महान !
✍️ सचिन काळोजी 🙏

.jpeg)
Comments
Post a Comment