नको वन्स मोअर | Not Again
Covid-19 च्या 1'st एडिशनला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता नवी बातमी कानी पडतेय ती म्हणजे Covid-19 Pro म्हणजेच दुसऱ्या लाटेची.
ऐकलं का ? लाट येतेय म्हणे दुसरी
च्या मायला, ओसंडू तरी दे पहिली
च्या मायला, ओसंडू तरी दे पहिली
विषाणूची या कोरोनाच्या, लाटेवर लाट
किनाराही सरला, झाली पळता भुई सपाट
किनाराही सरला, झाली पळता भुई सपाट
असा रे कसा ? हा चायनाचा माल
युज अँड थ्रो म्हणता म्हणता टिकला दीर्घकाळ ?
आपले तर दूरच अडकलेले ताळेबंदीमुळे
परकेही गमावले आता संक्रमणामुळे
तंबूत मोजकेच परतले, लाखो झाले बाद
वन मॅन आर्मी साला, कोरोनाच नाबाद
उघड्या नाकाने आत कोरोना घुसतोय
मास्क लावला तर जीव घुसमटतोय
पाळा म्हणते सरकार, सामाजिक अंतर
पोटापाण्याचं काय ते मग बघुया नंतर
म्हणे दो गज दूरी, मास्क हैं जरुरी
हाक आर्ततेची, देवा ऐक आतातरी
शिकवाया आला म्हणे नवी नीतिमूल्ये
सिलॅबसच संपेना याचा, वर्ष जरी सरले
टीव्ही वर सदानकदा कोरोनाचाच स्कोर
थांब रे बाबा आता, नको 'वन्स मोअर',
नको 'वन्स मोअर'!
✍️सचिन काळोजी
तुमच्या अनमोल प्रतिक्रिया नक्की कळवा.


.jpeg)
Haert touching poem Sachin
ReplyDeleteThanks a lot.
Delete