आस का नसावी माझिया मनी.....?

दर्शनासाठी तवं एका, झुरती हे नयनं माझे
ऐकाया तवं मधुर वाणी, आतुर हे कर्ण माझे
सांग सखे तुझ्यावाचूनि, जीवन हे असेल कसे
गुलाबी गारवा अन् गुलाबी स्वप्नं, सांग तुला विसरु कसे ?  

  आस का नसावी माझिया मनी.....?

चंदनापरी गौर तुझा चेहरा
लाजवी जणू पूनवेच्या चंद्राला

कोरलेल्या भुवयांखाली
नेत्र तुझे ते मृगनयनावानि

आधीच बोलके अन् लाजरे
लाजताना तर दिसती जादुई

नाजूक गालांना दुडी बघ येई
हसताना ती चंद्रकोरीवानि

नाजुक बोलणे, खुदकन हसणे
स्वभाव तुझा असे लय भारी

नाक कोवळे तुझे नाजुक
जणु फुलले चाफेकळीवानि

ओठांचेही पंख फडकवूनी
हसू उमलते चेहऱ्यावरूनी

सांग सखे तुझ्या दर्शनाची
आस का नसावी माझिया मनी
सांग प्रिये आस का नसावी माझिया मनी
  
✍️ सचिन काळोजी.






Comments