A melancholy, damp evening / चिंब ओल्या सायंकाळी

चिंब ओल्या सायंकाळी

 खुणावती मला या पावसाच्या सरी 

यांच्यासोबत बागडणाऱ्या वाऱ्याच्या लहरी

संध्याकाळी घरी जायची, असली घाई जरी

पावसामध्ये चिंब भिजण्याची, मौजच काय न्यारी

रस्त्याकडेला बोलवणारी काकांची टपरी

वा असो भैय्याची तिखट गोड पाणीपुरी

तब्येतीची थोडीफार असली काळजी जरी, तरी

पावसामध्ये चिंब भिजण्याची मौजच लई भारी


लहानपणी बनायची कागदाची होडी

आता मात्र घाबरवते पाणी उडवणारी गाडी

छत्री आणि रेनकोट असले जरी सवंगडी

पावसामध्ये चिंब भिजण्याची बातच लई बडी





Comments

Post a Comment

Popular Posts