प्रार्थना आणि नवस
प्रार्थना
आपण देवाकडे प्रार्थना करतो याचा अर्थ आपल्याला
नक्की काय हवं आहे हे आपण आपल्या मनाच्या पातळीवर स्पष्ट करतो. असं केल्यामुळे आपल्याला नक्की काय हवं आहे हे आपल्याला समजते, त्या मागणीबाबतचा सर्व गोंधळ दूर होतो आणि आपला संपूर्ण लक्ष आपल्या ध्येयाकडे स्थिर राहतो.
प्रार्थना करण्यासाठी आपण मंदिरात किंवा आपल्या घरातील देवघर किंवा देवाच्या फोटोसमोर हात जोडून उभे राहतो. कारण या अशा जागा आहेत जिथे आपल्याला खूपच मानसिक शांतता जाणवत असते. इथे सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याने सात्विक भाव निर्माण होतात, ज्यामुळे मन स्थिर होण्यास मदत होते. स्नान वगैरे करून स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करून ही प्रार्थना करणे गरजेचे असते कारण अशावेळी आपले मन प्रसन्न असणे फार महत्त्वाचे असते.
नवस
काय पाहिजे आहे हे निश्चित झाल्यानंतर ते मिळण्याबाबतचा विश्वास दर्शवणारी भविष्यातली कृती स्पष्ट करणेही गरजेचे असते. नवस करतो तेव्हा आपण आपल्या मागणी पूर्ण होण्याच्या विश्वासाला ठामपणा देत असतो. मागणी पूर्ण होईल की नाही याबाबतच्या सर्व शंका कुशंका नष्ट होतात. मात्र नवस करताना तो शक्य कोटीतील असावा. अन्यथा नवस करण्यामागील हेतूच नष्ट पावेल.
आता या मागणीशी वचनबध्द राहणे हे ही तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी केलेली मागणी आणि नवस याची सतत जाणीव असणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने आपल्या बाबतीत घडत असलेल्या घटनांकडे सकारात्मक दृष्टीने बघण्याची शैली असावी लागते. कारण या प्रत्येक घटना आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी मार्ग दाखवत असतात.
मागणी पूर्ण झाल्यानंतर न विसरता नवस फेडावा. नाहीतर पुढील मागणीच्या वेळी मनाचा एक धागा मागे कुठेतरी ओढला जातो. ज्यामुळे भविष्यातील मागणी पूर्ण होण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.
निर्गुण परमात्म्याची ओळख , क्लिक करा आणि पहा!
👇👇👇👇👇👇👇
- सचिन काळोजी.
(वरील माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्र -मंडळीना नक्कीच शेअर करा !)





.jpeg)
बरोबर
ReplyDelete