Shiroda Velagar (Beach) | शिरोडा वेळागर
शिरोडा वेळागर
नैसर्गिक सृष्टीसौंदर्याची खाण ज्याला लाभली आहे, ते म्हणजे आपलं कोकण. इथली धार्मिक स्थळे, इथली किनारपट्टी, सगळंकाही विविध गुणवैशिष्ट्यांनी नटलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातल्या शिरोडा गावचा समुद्रकिनारा, हा त्यापैकीच एक. कोकणदर्शन कराल, तेव्हा शिरोडा वेळागरला मात्र आवर्जून भेट द्या.
कोकण म्हणजे जणु, वैशिष्ट्यांचे माहेरघर,
त्यापैकीच एक आहे, शिरोड्याचा वेळागर.
समुद्रकिनारा असे, सर्वांसाठीच आकर्षण,
कॅमेऱ्यात टिपती कुणी, मनमोहक इथले क्षण.
सुरीच्या बागेत वाहे, वारा थंड गार,
वर आभाळी घिरट्या घाली, स्वच्छंद घार.
ढगांच्या आड बसे, सुर्य कधि लपुन,
रांगोळी त्यांची आकाशी, घेई तो रेखाटून.
किनाऱ्यावरती स्टार फिश, आणिक शंख शिंपले,
भेटावया जणु आम्हा, तेही अधीर झाले.
कधि उडती वाऱ्यासंगे, पक्षांचे थवे,
पांघरूनी पंखांमधे, बळ इथले नवे.
मोहवती सर्वांना, उंच उंच लाटा,
हरवतो मग आम्ही, परतायच्या वाटा.
डोळ्यांमधि मावेना, किनारा हा मोठा,
खुणावतोय हा तुम्हाला, एकदा नक्कीच भेटा.
एकदा नक्कीच भेटा...
- सचिन काळोजी.








.jpeg)
Kadak खुप छान.👌🔥
ReplyDeleteThanks
DeleteMast 👍
ReplyDeleteThanks
DeleteMst..
ReplyDeleteThanks 😊
Deleteयाहूनही अप्रतिम आहे, आमचा वेळागर.
ReplyDeleteMast 👌
ReplyDelete