Knowledge of these six things given by Bappa this year | यंदा बाप्पाने दिले या सहा गोष्टींचे ज्ञान...
Knowledge of these six things given by Bappa this year
यंदा बाप्पाने दिले या सहा गोष्टींचे ज्ञान...
यंदाचा गणेशोत्सव सोहळा
खरोखरचं आगळा वेगळा
२.डीजे, डॉल्बी न लावताही उत्सव साजरे करता येतात.
३.सामान्य माणूसही बाप्पाची प्रथम पुजा करू शकतो.
४.घरगुती सजावट आणि मोजकीच रोषणाईसुद्धा वातावरण प्रसन्न बनवू शकते.
५.नुसत्या नामस्मरणानेही वातावरण भक्तिमय होऊ शकते.
६.बाप्पाच्या सेवेसाठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे.
१> कमी उंचीच्या मूर्तीही सुबक आणि आकर्षक दिसतात.
तू मोठा की मी मोठा, या नादात गणपतीच्या मूर्तीची उंची दरवर्षी वाढतच चाललेली.
काहींना तर दरवाजेही तोडावे लागायचे. यंदा मात्र सामाजिक अंतर राखण्यासाठी कमी
वजनाच्या आणि कमी उंचीच्या मुर्त्या बनवाव्या लागल्या. तेव्हा कुठे कळलं,
की कमी
उंचीच्या मूर्तीही सुबक आणि आकर्षक दिसतात.
२> डीजे, डॉल्बी न लावताही उत्सव साजरे करता येतात.
काही अपवाद वगळता विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजे, डॉल्बी चा उपयोग करणे म्हणजे
प्रतिष्ठेची बाब मानली जायची. ध्वनिप्रदूषणाला आळा घालायचा म्हणून ते ही रद्द झाले.
तेव्हा कुठे कळलं की "मोरया मोरया" असा नामघोष करत करतही मिरवणूक काढता येते.
३> सामान्य माणूसही बाप्पाची प्रथम पुजा करू शकतो.
सामाजिक अंतर, संचार बंदी यामुळे बऱ्याच ठिकाणी भटजी स्वतः जाऊन पूजा करू शकले
नाहीत. विशेष म्हणजे यावर बाप्पानेही कोणताच आक्षेप घेतला नाही. स्वतः भक्ती भावनेने
केलेली पुजा, भटजींकरवी ऑनलाईन केलेल्या पुजेपेक्षा जास्त समाधान आणि मानसिक शांती
मिळवून देते. तेव्हा कुठे कळलं की सामान्य माणूसही बाप्पाची प्रथम पूजा करू शकतो.
४> घरगुती सजावट आणि मोजकीच रोषणाईसुद्धा वातावरण प्रसन्न बनवू शकते.
घरात गणपती पुजलाय म्हणजे नातेवाईक, मित्रमंडळींची ये-जा असणारच. बाजारी वस्तूंनी
केलेली सजावट आणि महागडी रोषणाई पाहून ते खूष होतील. पाहुण्यांमधे आपली वाहवा होईल.
पण यंदा पाहुणे आलेच नाहीत, तरीही आपण केलेली तयारी पाहून मन तृप्त होत होते. तेव्हा
कुठे कळलं की घरगुती सजावट आणि मोजकीच रोषणाईसुद्धा वातावरण प्रसन्न बनवू शकते.
५> नुसत्या नामस्मरणानेही वातावरण भक्तिमय होऊ शकते.
गणपतीसमोर भजन नाही, असं घर कुठे सापडणार नाही. ऐपत नसेल तर पैसे उसणे घेऊन
लांबलांबची भजनी मंडळे आणून त्यांच्यावर भलामोठा खर्च करून उत्सव साजरा केला नाही
तर मजाच वाटत नव्हती. सार्वजनिक गणेश मंडळांमधे तर भजन स्पर्धांचं भव्य आयोजन
केलं जायचं, विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम राबवले जायचे. यंदा मात्र सगळं नामस्मरणावरच
भागवावं लागलं. पण भक्ती म्हणजे काय हे यामुळेच समजलं. तेव्हा कुठे कळलं की नुसत्या
नामस्मरणानेही वातावरण भक्तिमय होऊ शकते.
६> बाप्पाच्या सेवेसाठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे.
बऱ्याच लोकांची अशी तक्रार असते की गणेशोत्सव काळात त्यांची नुसती तारांबळ उडलेली
असते. देवाला पाया पडायला सुद्धा वेळ नसतो त्यांच्याकडे. गणपती भलेही अकरा दिवस ठेवा,
पण पाहुण्यांना भेट देण्यातच सगळे दिवस संपतात. यंदा ना पाहुणे आले ना आपण पाहुण्यांकडे
गेलो. दररोजची पूजा, आरती करायला मनसोक्त वेळ भेटला. देवाला दाखविलेला नैवेद्य
सहकुटुंब सहपरिवार ग्रहण करता आला. मूर्तीसमोर क्षणभर उभे राहून प्रार्थना करता आली.
तेव्हा कुठे कळलं की बाप्पाच्या सेवेसाठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे.

.jpeg)
मस्त लेख आहे
ReplyDeleteधन्यवाद !
Delete